।। ओ३म् ।।
|| मनुस्मृतीनुसारच राज्याभिषेक झाला ||
समाजात आज काल शिवाजी महाराजांचा राज्यभिषेकाला नकार दिला गेला म्हणतात ||
मूलतः काही प्रश्न असे कि , पुरोगामी विचारांचे सर्वधर्मसमभाव विचारांचे शिवाजी महाराज स्वतःचा राज्याभिषेक का करू इच्छित होते कारण राज्याभिषेक हि गोष्ट वेदिक हिंदू धर्माचीच आहे ? बरं त्यांनी ठरवले तरी त्यांनी नेमकं शास्त्र पद्धतीला महत्व का दिले ? काय शिवाजी महाराज धर्म म्हणजे केवळ हिंदू धर्म मानत होते, ज्यमुळे त्यांनी शास्त्रोक्त राज्याभिषेक करायची काय गरज पडली ? असे अनेक प्रश्न पडतात. बरं शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक करायचा म्हणजे मग त्यात प्रथम क्षत्रिय उपनयन संस्कार करणे आवश्यक चूडाकर्म करणे आवश्यक होय गुण कर्म योग्येते अनुसार क्षत्रिय असण्याची हि आवश्यकता होती केवळ क्षत्रियांच्या घरात जन्मले ले म्हणून क्षत्रियच होत नाही . परंतु शिवाजी महाराजांचे संपूर्ण शिक्षण हेय क्षत्रिय गुण कर्म स्वभावानुसार च झाले होते. परंतु त्या काळात त्यांचे चूडाकर्म व क्षत्रिय वर्ण उपनयन संस्कार झाले नाहीत.
‘‘जन्मना जायते शूद्रः संस्काराद् द्विज उच्यते।’’ (स्कन्दपुराण, नागरखण्ड 239.31)
अर्थ:- जन्म पाससून सर्वच मनुष्य शूद्र असतात मग तो जन्मलेला ( ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य व शूद्र वर्णाच्या घरत जन्मलेला असू ) तो व्यक्ती तेव्हाच द्विज बनतो जेव्हा तो ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या पैकी एका वर्णाच्या गुण कर्माचे उपनयन संस्कार करतो.
तसेच, मुंडन व उपनयन विधी बाबत मनू महाराज काय म्हणतात ते आपण बघुयात.
मुंडन संस्कार -
चूडाकर्म द्विजातीनां सर्वेषामेव धर्मत: ।
प्रथमेऽब्दे तृतीये वा कत्र्तव्यं श्रुतिचोदनात् ।।३५।। २/३५
(सर्वेषाम् एव द्विजातीनां चूडाकर्म) सर्व द्विजातीयांनी = ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, वर्णांच्या इच्छुकांची (माता - पिता- यांच्या इच्छेप्रमाणे हा संस्कार ) चूडाकर्म मुंडन संस्कार (धर्मत्:) धर्मानुसार (श्रुतिचेादनात्) वेदाच्या आज्ञेनुसार (प्रथमे अब्दे) पहिल्या वर्षी (वा तृतीये) अथवा तिस-या वर्षी (आपल्या सोयीप्रमाणे )(कत्र्तव्यम्) केला पाहिजे ।। ३५ ।।
"हे चूडाकर्म अर्थात मुंडन (जावळ काढणे) बाळाच्या जन्माच्या एक वर्षात किंवा तिस-या वर्षात करावे. उत्तरायणकाळ, शुक्लपक्षात ज्या दिवशी आनंदमंगल असेल त्यादिवशी हा संस्कार करावा ." (सं.वि.60)
उपनयाची विशेष वेळ -
ब्रह्मवर्चसकामस्य कार्यं विप्रस्य पञ्चर्मे ।
राज्ञो बालर्थिन : षष्ठै वैश्यस्येहार्थिनोऽष्]मे ।।37।।[2।37]
(इह ब्रह्मवर्चस - कामस्य) या जगात ज्याला ब्रह्मतेज, ईश्वर, विद्या, आदीची लवकर व अधिक प्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल, अशा (व्रिपस्य) ब्राह्मण वर्णाची इच्छा असणा-याचा (माता- पित्याच्या इच्छेच्या आधारावर अशा अर्थाने) उपनयन संस्कार (पञ्चमे कार्यम्) पाचव्या वर्षीच केला पाहिजे (इह बलर्थिन राज्ञ:) या जगात बल पराक्रम आदी क्षत्रिय विद्या अधिक आणि लवकर प्राप्त करण्याची इच्छा असणा-या क्षत्रिय वर्णाच्या इच्छुकाचे (षष्ठे) सहाव्या वर्षात आणि (इह अर्थिन : वैशस्य) या जगात धन- ऐश्वर्याची पुष्कळ आणि लवकर मिळविण्याची इच्छा करणा-या वैश्य वर्णाच्या इच्छुकाचा (अष्]मे ) आठव्या वर्षात उपनयन संस्कार केला पाहिजे ।। 37।। (1)
उपनयनाचा अंतिम अवधी -
आषोडशाद्ब्राह्मणस्य सावित्री नातिवर्तते ।
आद्वाविंशात्क्षत्रबन्धोराचतुर्विशतेविंश: ।। 38।। २/38
(ब्राह्मणस्य) ब्राह्मण वर्ण धारण करू इच्छिणा-याचे सोळा वर्षांपर्यंत (आ- पोशात्) (क्षमबन्धो :) क्षत्रिय व वर्णाच्या इच्छुकाने (आ - द्वाविंशात् बावीस वर्षांपर्यंत (विश:) वैश्य वर्णाच्या इच्छुकाचे (आ- चतुर्विशते :) चोवीस वर्षांपर्यंत (सावित्री न अतिवर्तते) यज्ञोपवीताचे अतिक्रमण होत नाही, अर्थात या वयापर्यंत उपनयन संस्कार केला जऊ शकतो ।। 83।।
अशाप्रकारे मनू महाराज म्हणतात कि कोणत्या द्विज वर्णाचा उपनयन संस्कार कोणत्या वयात होणे आवश्यक आहे तसेच मुंडन संस्कार हेय सुद्धा कधी होणे गरजेचे आहे असे वर स्पष्ट केले आहे.
मूळ मुद्दा शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक करायचा म्हंटल्यावर, धर्म शास्त्र च्या नियमन अनुसारच करावा लागतो व या गोष्टींचे नियम केवळ मनुस्मृती या संविधानातच होते. तसेच धर्म शास्त्रांच्या अभ्यासा शिवाय शिवाजी महाराजांनी शास्त्रोक्त राज्याभिषेकाचा निर्णय घेतला का ? त्यावेळी समाज कोणत्या धर्माचा होता रयत कोणत्या धर्माची होती ? १८ पगड जाती कोणत्या धर्माच्या होत्या ? धर्म हि गोष्टच नसती तर धर्म शास्त्र प्रमाणे राज्याभिषेक करणे गरजेचे नव्हते, कारण राज्यभिषेक हि गोष्ट केवळ हिंदू(वैदिक) धर्मातच आहे त्यातच मुंडन संस्कार , उपनयन संस्कार योग्य वेळी झालेला क्षत्रिय वर्णी माणूसच राजा बनू शकतो हे आपण वरील मनुस्मृतीच्या श्लोकां मधून पहिलेच आहे.
त्याच वेळी शास्त्रांचा अभ्यास करणारे संभाजी राजे हि उपस्थित होते, जर हिंदू धर्म मान्यता हि नव्हती तर खुद्ध धर्मवीर संभाजी राजेंनीच राज्याभिषेक करून दिला नसता. राज्याभिषेक हि संपूर्ण वैदिक पद्धत होय. राज्याभिषेक मध्ये संपूर्ण वेद मंत्रच असतात यज्ञ होत असत. तर शिवाजी महाराजांच्या काळात मनुस्मृती उपलब्द्च नसेल कायदे कानून नसतील तर राज्याभिषेक या सर्व गोष्टींची आवश्यकता काय ? राज्याभिषेक करण्याच्या निर्णयातच सर्व प्रश्न आले. शास्त्रोक्त राज्याभिषेकाचा संपूर्ण अर्थ झाला कि नियमांनुसार राज्याभिषेक होणे आवश्यक मग ते नियम कोणते असतात त्यांची पूर्तता करणे अथवा झाली आहे का हेय सर्व तपासून बघणे, इतपत सर्व ज्ञान कोणत्या हि राजाला नक्कीच असते.
पुढे विषय येतो कि हि सर्व माहिती असल्यास राज्याभिषेकाला विरोध होण्याची गरजच काय ? जरी झाला तर काय शिवाजी महाराज पूर्वोक्त तयारी न करता हा निर्णय घेऊ शकतात काय ? आणि या वरून ह्या सर्व गोष्टी तर्क संमत वाटत नाहीत.
आता आपण बघुयात राजा चे कोणते गुण कर्में असतात ||
क्षत्रियांचे गुण, कर्में व स्वभाव
प्रजाप्रजानां रक्षणं दानमिज्याऽध्ययनमेव च ।
विषयेष्वप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासत : ।। 89।। ७/८९
"दीर्घ ब्रह्मचर्याने (अध्ययनम्) सांगोपांग वेदादी शास्त्रे यथावत् शिकणे, (इज्या) अग्निहोत्र आदी यज्ञ करणे (दानम्) सत्पात्री विद्या, सुवर्ण आदी व प्रजेस अभयदान देणे, (प्रजानां रक्षणम्) प्रजेचे सर्वप्रकारे सर्वदा पालन व रक्षण करणे ..........." (विषयेषु अप्रसक्ति :) विषयांपासून अनासक्त होऊन सदा जितेंद्रिय राहणे- लोभ, व्यभिचार, मद्यपानादी नशा आदी दुव्र्यसनांपासून दूर राहून विनय, सुशीलता आदी शुभ कर्मांत सदा प्रवृत्त राहणे (क्षत्रियस्य समासत :) ही संक्षिप्तपणे क्षत्रियाची कर्मेा आहे. ।। 89।। (स.प्र.175)
"न्यायाने प्रजेचे रक्षण अर्थात पक्षपातरहित होऊन श्रेष्ठांचे सत्कार व दुष्टांचा तिरस्कार करणे, सर्वप्रकारे सर्वांचे पालन करणे, दान , विद्या , धर्म यांच्याकडे प्रवृत्ती व सत्पात्रांच्या सेवेत धनादी पदार्थांचा व्यय करणे, (इज्या) अग्निहोत्रादी यज्ञ करणे व करविणे, (अध्ययन) वेदादी शास्त्रांचा अभ्यास व शिकविणे, आणि विषयांत न फसता जितेंद्रिय राहून सदैव शरीर व आत्म्याने बलवान राहणे . " (स.प्र. पृ. 90).
अनुशीलन - "क्षत्रिय" नाम कर्मणा व्यवस्थेचे सूचक
(1) क्षणु - हिंसा अर्थाची (तनादि) धातूपासून "क्त:" प्रत्ययाच्या संधीने "क्षत् " शब्द सिद्ध होतो व "क्षत" उपपदाने त्रै पालन करणे अर्थामध्ये (भ्वादि) धातू वे पासून "अन्येष्वपि दृश्यते " (अष्टा. 3।2।101)
सूत्रांचा प्रत्यय पूर्वपदान्त्याकारलोप होऊन "क्षत्र" शब्द बनला. "क्षत्र एव क्षत्रिय:" स्वार्थ मध्ये "इय:" पासून क्षत्रिय : अथवा क्षत्रस्य अपत्यं वा, "क्षत्राद् घ :" (अ.4।1।138) सूत्रापासून जन्म घेणे अर्थात "घ" प्रत्यय होऊन क्षत्रिय शब्द बनला. "क्षदति रक्षति जनान् क्षत्र:" जो जनते च्या रक्षणाचे कार्य करतो अथवा क्षण्यते हिंस्यते नश्यते पदार्थो येन स "क्षत: " घातादि: तत्स्त्रायते रक्षतीति क्षत्र : आक्रमण, जखम, हानी आदींपासून लेाकांचे रक्षण करणारा असल्यामुळे क्षत्रियास "क्षत्रिय" म्हणतात. ब्राह्मण ग्रंथांत क्षत्र राजन्य: (ऐ 8।2;3।4) क्षत्रस्य वा एतद्रूपं यद् राजन्य: (श. 13।1।5।3) क्षत्रिय "क्षत्र " याचेच रूप आहे, जो प्रजेचा रक्षक असतो.
(2) येथे अपत्यार्थ मध्ये "इय" आदेश जोडून क्षत्रिय आदी शब्द बनविल्यामुळे अशी शंका उत्पन्न होते की मनू जन्माच्या आधारावर वर्ण मानतो काय? या शंकेच्या निराकरणासाठी पुष्ट समाधान आहे. वंश केवळ जन्मानेच नव्हे तर विद्याजन्मानेही चालतो. अष्टाध्यायी 2।1।19 मध्ये "संख्यावंश्येन" सूत्रात विद्यानेही जन्म मानला आहे. मनुस्मृती 2।119-123 श्लोकांमध्ये स्पष्ट शब्दांत विद्येच्या आधारावर जन्म मानला आहे. अशाप्रकारे गुणग्रहिता , कार्यकारण भाव, विद्या. यांच्या आधारावरही अपत्य आदी संबंध मानले आहेत. जसे सूर्य, वरुण आदींची कुणी पत्नी वा अपत्य आदी असत नाहीत, पण तरीही कार्यकारण भावाने व गुणग्रहिता आदींंच्या आधारावर अदितीचा पुत्र आदित्य, सूर्याची पत्नी सूर्या आदी , तसेच वरुणानी , मैत्रावरुण आदी प्रयोग होतात. विस्तृत चर्चा "मनुस्मृती अनुशीलन " मध्ये पाहावी .
(3) क्षत्रियाच्या विस्तृत कर्तव्यांचे वर्णन 7।1 ते 9।225 श्लोकांत आहे.
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्।।२।। भ० गी०।।अ. १८।। श्लो. ४३।।
(शौर्यम्) शेकडो, हजारो लोकांशी एकट्याने युद्ध करताना भय न वाटणे (तेजः) सदैव तेजस्वी म्हणजे दीनता रहित प्रगल्भतायुक्त दृढ राहणे, (धृतिः) धैर्यवान् बनणे, (दाक्ष्यम्) राजा व प्रजा संबंधीत व्यवहार व सर्व शास्त्रे यांमध्ये अत्यंत चतुर असणे, (युद्धे अपलायनम्) युद्धामध्ये हृढपणे व नि:शंक राहुन, युद्धापासून दूर पळून न जाणे अर्थात याप्रमाणे लढावे की निश्चित विजय होईल. पळून जाऊन अथवा शत्रूला चुकवून विजय होत असेल तर तसे करणे, (दानम्) दानशील असणे, (ईश्वरभावः) पक्षपातरहित सर्वांशी यथायोग्य वर्तन करणे, विचार करून देणे, प्रतिज्ञा पूर्ण करणे, कधीही वचनभंग होऊ न देणे ही अकरा कर्म व गुण क्षत्रिय वर्णाचे (स.प. ४)
राजा बनण्यास अधिकारी कोण ?
ब्राह्मं प्राप्तेन संस्कारं क्षत्रियेण यथाविधि ।
सर्वस्यास्य यथान्यायं कर्तव्यं परिरक्षणम् ।। 2।। ७/२
(ब्राह्मं संस्कारं प्राप्तेन क्षत्रियेण) जसा परम विद्वान ब्राह्मण असतो, तसा विद्वान (यथाविधि) पूर्ण विधिनुसार म्हणजे उपनयनेना दीक्षित होऊन समावर्तनकालापर्यंत ब्रह्मचर्यपालन करीत सुशिक्षित होऊन क्षत्रियासाठी हे योग्य आहे की (अस्य सर्वस्य) या सर्व राज्याचे (परिरक्षणम्) रक्षण (यथान्यायं कर्तव्यम्) न्यायाने यथावत करावे ।। 2।। (स.प्र.)
वरील वर्णन वरून इतके समजते कि शिवाजी महाराज गुण कर्म नुसार नक्कीच क्षत्रिय होते. परंतु शास्त्रोक्त त्यांचे केवळ संस्कार होणे बाकी होते. शिवाजी महाराजांनी संपूर्ण पूर्व विचार व तयारी देखील केली असणारच. जर वैदिक धर्मानुसार राज्याभिषेक करायचा तर त्याच्या नियमां नुसारच होणार हि सरळ गोष्ट आहे, त्यामुळे जर कोणी म्हणले ३ ४ ब्राम्हणांनी राज्याभिषेकाला विरोध मनुस्मृती अनुसार केला असेल तर हि गोष्ट तर्क संगत नसून शिवाजी महाराजांनाच अपमान करणारी आहे. कोणताही राजा पूर्व तयारी नसताना धर्माप्रमाणे शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक करू शकत नाही. राजा कोणती हि गोष्ट करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्ण विचार करूनच निर्णय घेणारा असतो. त्या साठी मनुस्मृती प्रमाणेच राजा कसा असतो त्याचे उदाहरण म्हणून एक माहिती देत आहे.
राजा बनण्याची आवश्यकता -
अराजके हि लोकेऽस्मिन्सर्वतो विद्रुते भयात् ।
रक्षार्थमस्य सर्वस्य राजानमसृजत्प्रभु: ।। 3।। ७/३
(हि) कारण (अराजके अस्मिन् लोके ) राजा नसल्यास या जगात (सर्वत: भयात् विद्रुते) चोहीकडे भय, व्याकुळता पसरल्यामुळे (यस्य सर्वस्य रक्षार्थम्) या सर्व समाजाच्या व राज्याच्या सुरक्षितेसाठी (प्रभु: राजानम् असृजत्) प्रभूने , "राजा" पद बनविले आहे, अर्थात राजा बनविण्याची प्रेरणा मानवांच्या मेंदूत दिली आहे ।।3।।
राजाचे आठ विशिष्ट गुण -
इन्द्रानिलयमार्काणामग्नेश्च वरुणस्य च ।
चन्द्रवित्तेशयोश्चैव मात्रा निर्हृत्य शाश्वती : ।। 4।। ७/४
हा सभेश राजा (इन्द्र) इंद्र म्हणजे विजेसमान चपल, ऐश्वर्यकर्ता (अनिल) वायुसमान सर्वांसाठी प्राणवत प्रिय आणि हृदयाची स्थिती जाणणारा (यम) यम- पक्षपातरहित न्यायाधीशाप्रमाणे वर्तन असणारा (अर्काणाम्) सूर्याप्रमाणे न्याय, धर्म, विद्येचा प्रकाशक, अंधकाराचा म्हणजे अविद्या, अन्यायाचा निरोधक, (अग्ने:) अग्नीसमान दुष्टांना भस्म करणारा (वरुणस्य) वरुण म्हणजे बांधणारा - दुष्टांना अनेकप्रकारे बांधणारा (चन्द्र वित्ते- शयो:) चंद्रासारखा श्रेष्ठ पुरुषांना आनंद देणारा, धनाध्यक्षाप्रमाणे कोश समृद्ध करणारा सभापती असावा (शाश्वती: मात्रा निर्हृत्य च ) वर सांगितलेल्यांच्या स्वाभविक मात्रा गुणांच्या अंशाचा सार घेऊन ईश्वराने "राजा" चे व्यक्तित्व निर्माण केले आहे. (च) हि पूर्वीच्या श्लोकाच्या"राजानम् असृजत्"क्रियेची अनुवृत्ती आहे. ) ।। 4।। (स.प्र. 140)
अनुशीलन - राजाच्या आठ विशिष्ट गुणांचे विस्तृत वर्णन - (व्याख्या )-
(क) महर्षी मनूंनी या श्लोकात म्हटले आहे की राजा हा आठ विशिष्ट गुणांनी युक्त असला पाहिजे. ज्याप्रमाणे खालील आठ ईश्वरीय दिव्य व्यक्तींचे कार्य किंवा स्वभाव असतो, तसाचा राजाचा स्वभाव व आचरण असले पाहिजे. मनूंनी 9।303 ते ३११ श्लोकांमध्ये स्वत:च या गुणांचे सविस्तर वर्णन केले आहे ते असे -
(1) इंद्र (वृष्टिकारक) ज्याप्रमाणे विपुल वृष्टी करून जगास तृप्त करतो, त्याप्रमाणे राजाने प्रजेस विविध सुख - सुविधा देऊन ऐश्वर्यही द्यावे. प्रजेच्या कामना पूर्ण करून संतुष्ट ठेवावे (9।304). इदि परमैश्वर्ये भ्वादि धातूशी "ऋजेन्द्राग्नवज्र" (उणादि 2।28) सूत्राच्या "रन" प्रत्ययाच्या संधीने "इन्द्र" शब्द सिद्ध होतो. "इन्दते वा ऐश्वर्यकर्मण:"" (निरुक्त 10।8) ऐश्वर्यप्रदाता असल्यामुळे इंद्र म्हणविला जातो (7।7) मध्ये याच्या पर्यायवाची रूपात "महेन्द्र" चा उपयोग आहे.
(2) वायू- जसा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी प्रविष्ट होऊन वावरतो, त्याच प्रमाणे राजाने आपल्या गुप्तहेरांकडून सर्वत्र संचार करून आपल्या प्रजेची व शत्रूंच्या प्रजेची माहिती घेत राहावे (9।306). (वायु: वा गतिगन्धयो: आदादी धातू "क्रवायाजि." (उणादि 1।1) सूत्राचा "उ" प्रत्यय "वायुर्वातेर्वेत्तेर्वा स्याद् गमिकर्मण:" (निरु. 11।5). 9।३०६ मध्ये "मारुत" चा उपयोग आहे.
(3) यम (ईश्वराची मारक किंवा नियंत्रक शक्ती) - ज्याप्रमाणे कर्मफळाची वेळ आल्यावर प्रिय आणि शत्रू, सर्वांना धर्मपूर्वक म्हणजे न्यायानुसार शिक्षा करतो किंवा मारतो, त्याच प्रकारे राजानेही अपराध केल्यावर प्रिय, शत्रू, सर्व प्रजेस न्यायपूर्वक शिक्षा केली पाहिजे आणि आपल्या नियंत्राणाखाली ठेवले पाहिजे (9।307). 7।7 मध्ये मनूंनी यमास "धर्मराट्" असा पर्यायवाची शब्द घेतला आहे. धर्म म्हणजे न्यायपूर्वक शासन
करणारा तो "धर्मराट्" [ "यमु उपरमे" भ्वादि धातूचा कर्तरि पचाद्यच् ""यम: यच्छतीति सत:"" (निरु. 10।19).]
(4) अर्क - सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांनी न तापविता पाणी ग्रहण करतो (वाष्प रूपात ), त्याचप्रमाणे राजाने प्रजेस कष्ट न देता, हानी न करता (7।128- 129) कर गोळा करावा (9।305). (अर्च पूजायाम् भ्वादि धातूपासून "कृदाधारर्चिकलिभ्य:क:" (उणादि 3।40) सूत्रास "क:" प्रत्यय). 9।305 मध्ये पर्यायवाची
रूपात "आदित्य" उपयोजिला आहे.
(5) अग्नी - ज्याप्रमाणे अग्नी अशुद्धीचा नाश करुन शुद्धी करणारा असतो. आणि तेजयुक्त असतो, त्याचप्रकारे राजा अपराध, हानी व दुष्टपणा करणा-यांना व त्रास देणा-यांना प्रभावीपणे शिक्षा करणारा व दंडाद्वारे सुधारणा करणारा असावा.( 9।310) (अगि- गतौ धातूपासून "अड्.गेर्नलोपश्च"(उणादि 4। 50) सूत्रास "नि:" प्रत्यय, नि लोप:)
(6) वरुण - पाण्याच्या लाटा आणि भोवरा यांच्या पाशात प्राण्यांना अडकावितो, त्याप्रमाणे राजाने अपराध्यांना आणि शत्रूंना बंधनात किंवा करागृहात टाकावे (9।308). (वृत्र - वरणे) स्वादि धातूपासून "कृवृदारिभ्य उनन्" (उणादि 3।53 ) सूत्रास "उनन्" प्रत्यय).
(7) चंद्र - जसा चंद्र शीतळपणा देतो, आणि पूर्णिमेचा चंद्र पाहून जसे मन प्रसन्न होते, त्याचप्रकारे राजा प्रजेस शांती आणि आनंद देणारा असावा. त्यास राजाच्या रूपात पाहून प्रजेस हर्ष व्हावा(9।306).(चदि आल्हादने दीप्तौ च स्वादिधातूपासून "स्फायितत्र्जिवत्र्चि:" (उणादि 2।13) सूत्राचा "रक्" प्रत्यय). 7।7 मध्ये "सोम" पर्यायवाचक आहे.
(8) वित्तेश, म्हणजे धनाढय 7।7 मध्ये कुवेर आणि 9।311 मध्ये याचा पर्यायवाची रूपात "धरा" "पृथ्वी" शब्द वापरला आहे. ज्याप्रमाणे धरती किंवा धनस्वामी परमेश्वर समभावाने सर्व प्राण्यांचे पालन - पोषण करतो, त्याचप्रकारे राजाने पक्षपातरहित होऊन समभावाने प्रजेचे पुत्रवत पालन करावे (9।311)
वेदामध्ये राजाच्या आठ गुणांचे वर्णन -
मनूंच्या या विधनाचा आधार वेद आहे. राजाचे हे गुणही वेदमंत्रांच्या आधारावरच वर्णिले आहेत. खालील मंत्र पाहावा -
सोमस्य राज्ञो वरुणस्य धर्मणि बृहस्पतेरनुमत्या उ शर्मणि ।
तवाहमघ मघवन्नुपस्तुतौ धातर्विघात: कलशंा अभक्षयन् ।। (ऋृ. 10।167।3)
(राज्ञ: सोमस्य वरुणस्यधर्मणि) राजा अग्नी, सोम चंद्र, आणि वरुणस्य वरुण (पाण्याची, पावसाची देवता ( यांच्या धर्मांत (उ) तसेच (बृहस्पते: अनुमत्या शर्मणि) बृहस्पति सूर्य, अनुमत्या लक्ष्मी अर्थात पर्यायाने वित्तेश किंवा पृथ्वीच्या आश्रयात (मघवन् ! धात! विधात!) आणि हे इंद्र! हे वायू ! (अहम् अद्य तम उपस्तुतै) मी तुमच्या उपस्तुती सान्निध्यात राहून, तुमचे गुण धारण करून (सोमकलशान् अभक्षयन्) ऐश्वर्य कलश म्हणजे
राज्यैश्वर्य सेवन केले आहे. अभिप्राय हा की या गुणांचे अंश धारण केल्यामुळे व त्यानुसार आचरण केल्यामुळे राज्यसंचलनात सफलता मिळविली.
यावरून असेच स्पष्ट होते कि शिवाजी महाराज वरील गुणांना यानुसारच कार्य करत होते. अन्यथा वरील गुण आणि शिवाजी महाराजांचे कार्य हा योगायोगच म्हणावा लागेल. पण ते हिंदू(वैदिक) धर्मातच जन्मले हाही योगायोगच का ? तर या गोष्टी तर्क संमत नाहीत कारण शिवाजी महाराजांवर बालपणी झालेले संस्कारच हे गुणच प्रदर्शित करतात कि त्यांचे शिक्षणच शास्त्रोक्त झाले आहेत. परंतु तत्कालीन वेळे नुसार त्यांचे १६ संस्कार प्रमाणे चूडाकर्म व उपनयन संस्कार हे झाले नसावेत अत्यंत युद्धकाळात तथा मुंडन व उपनयन हेय संस्कार करणे मातापिताचे कार्य होय परंतु शिवाजी महाराजांच्या बाल्यकाळात शहाजी राजे उपस्थित नसल्याने हेय संस्कार केले नसावेत.
आता पहा! राज्याभिषेकाला मनुस्मृती अनुसार विरोध कोणत्या विधींना झाला ? मुंडन तसेच क्षत्रिय वर्णाचे उपनयन झाले नसल्याने मग उपनयना शिवाय सर्वच माणसे शूद्र असत. म्हणूनच गागा भट्ट ला बोलवून प्रथम मुंडन संस्कार नंतर क्षत्रिय उपनयन संस्कार करवूनच राज्याभिषेक करवून घेतलाच ना ? मग हा तर सरळ सरळ मनुस्मृती कायद्यानुसारच राज्यभाषेक झाला म्हणावे लागेल. अथवा मनुस्मृती ला बाजूला सारून हि शिवाजी महाराज राज्याभिषेक करू शकत होते. परंतु त्यांनी त्या ३ ४ ब्राह्मणांच्या म्हणण्या नुसार धर्म द्रोह न करता मनुस्मृतीला सर्वोपरी मानून राज्याभिषेक केला हे आजकालचे टीकाकार स्वतःच सविता करीत आहेत. परंतु ते एकाबाजूने राज्याच्या गुण कौशल्याचा बुद्धिमत्तेचा अपमान हि करत आहेत. वरून गुण सांगितले आहेत त्या प्रमाणे राजा किती हुशार असतो हे मनुस्मृतीतूनच सिद्ध करून दाखवले गेले आहे.
शेवटी एकच गोष्ट त्या काळी शिवाजी महाराजांचा जो उपनयन संस्कार झाला मुंडन संस्कार झाला तो (वेदमंत्रानुसारच ) पण मनुस्मृतीचा कायदा म्हणून परंतु संस्कार काळ संपूनही करवून घेतला तो गागा भट्ट याने त्यावर कोणता हि ब्राम्हण उचिचू सुद्धा केला नाही कारण तेव्हा हि विरोध करता येत होता कि आता तर मुंडन व उपनांचा विधी संपला आहे. परंतु. मनुस्मृती प्रमाणे कोणताही वर्ण असणारा व्यक्ती कधीही आपला वर्ण बदलू शकतो.
कर्मानुसार वर्ण - परिवर्तन (वर्णबदल) -
शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम् ।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च ।। 10। 65।।
(श्रेष्ठ - अश्रेष्ठ कर्मानुसारच ) ( शूद्र उ ब्राह्मणताम् अ एति )शूद्र ब्राह्मण (च) आणि (ब्राह्मण: शूद्रताम एति) ब्राह्मण शूद्र होतो, अर्थात गुणकर्मानूकूल ब्राह्मण असेल तर ब्राह्मण तसेच जो ब्राह्मण , क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे गुण असणारा असेल , तर तो क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र होतो. तसा शूद्रही जर मूर्ख असेल, तर तो शूद्रच राहातो आणि जो उत्तम गुणयुक्त असेल तर तर यथायोग्य ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य होतेा . (क्षत्रियात् जातम् एवं तु तथैव वैश्यात् विद्यात्) त्याप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्य यांच्याविषयी जाणावे ।।65।। (ऋ.भा. भू. 313)
""उत्तम गुण - कर्म - स्वभावाचा जो शूद्र असेल तो वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण व वैश्य क्षत्रिय व ब्राह्मण, तसेच क्षत्रिय ब्राह्मण, वर्णाचे अधिकार आणि कर्मास प्राप्त होतो. त्याचप्रमाणे नीच कर्म आणि गुणांनी जो ब्राह्मण आहे तो क्षत्रिय ,वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय वैश्य, शूद्र, तसेच वैश्य तो क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय वैश्य, शूद्र तसेच वैश्य शूद्र वर्णाच्या अधिकारांस व कर्मांस प्राप्त होतो ।। "" (सं.वि. 106)
""जो शूद्र कुळात जन्मून ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्या सारखे गुण, कर्म ,स्वभाव असणारा असेल, तर तो शूद्र ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य होईल. तसेच तो ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यकुळात जन्मला असून ज्याचे गुण, कर्म आणि स्वभाव शूद्राप्रमाणे असतील , तो शूद्र होईल, तसेच क्षत्रिय, वैश्य यांच्या कुळात जन्म घेऊन ब्राह्मण आणि शूद्रही होतो" अर्थात चारी वर्णांत ज्या ज्या वर्णाप्रमाणे जो जो पुरुष वा स्त्री असेल तो तो त्याच वर्णात गणला जावा ।। "" (स.प्र. 87)
महर्षी दयानंदांनी पुणे येथील प्रवचनात हा श्लोक उद्धृत करून म्हटले - ""शूद्र ब्राह्मण होतो, आणि ब्राह्मणही शूद्र होतो"" या मनूंच्या वाक्याचाही विचार केला पाहिजे ."" (पृ.20)
प्राचीन काळी कर्मानुसार वर्णव्यवस्था प्रचलित होती, याची अनेक प्रमाणें व उदाहरणे उपलब्ध आहेत.
आपस्तम्ब धर्मसूत्र 1।5।10-11 मध्ये ही मान्यता स्पष्ट केली आहे -
धर्मचय्र्यया जघन्यो वर्ण: पूर्वंपूर्वं वर्णमापद्यते जातिपरिवृत्तैा ।। 1।।
अधर्मचय्र्यया पूर्वो वर्णो जघन्यं जघन्यं वर्णमापद्यते जातिपरिवृत्तौ ।। 2।।
धर्माचरणामुळे निकृष्ट वर्ण आपल्यापेक्षा उत्तमेात्तम वर्णास प्राप्त होतो आणि तो त्याच वर्णात गणला जातो, ज्याच्या योग्य तो असेल ।। 1।। तसे अधर्माचरणापूर्वी म्हणजे उत्तमवर्णीय मनुष्य आपल्यापेक्षा खालच्या - खालच्या वर्णास प्राप्त होतो आणि त्यास त्याच वर्णात गणले पाहिजे ।। 2।। (स.प्र. चतुर्थ समु.)
यावरून असे स्पष्ट होते कि जे ब्राम्हण मनुस्मृती अनुसार राज्याभिषेकास विरोध करू शकतात. त्याच ब्राह्मणाना मनुस्मृती १०/६५ या श्लोक प्रमाणे थोबाड हि हाणले जाऊ शकते. परंतु विरोध करून गुन्हा करणे हे लक्षणच ब्राम्हणांचे नव्हे. तरीही विरोध झाला असे मानले तर नंतर याच श्लोकांद्वारे शिवाजी महाराजांनाच पुन्हा संस्कार करून उपनयन करून राज्याभिषेक होऊ शकतो.
त्यामुळेच शिवाजी महाराजांनी माझ्यामते पूर्वापार तयारी करून राज्याभिषेक स्वइच्छेने धर्मानुसार शास्त्रोक्त काळा अनुसार केलाच तर तो बिना विरोध च झाला असणार. परंतु राज्याभिषेकाला विरोध केला असे म्हणणारे आणि ते हि मनुस्मृती नुसार असे कोण म्हणत असेल तर ते तर्क संगत नाही तसेच ते शिवाजी महाराजांचा अपमान करणारीच गोष्ट आहे जी ब्राह्मणांच्या द्वेष पायी बोलणे अयोग्यच. परंतु बऱ्याच इतिहासाच्या पुस्तकात कुठे विरोध झाला लिहिलेले आहे तर कुठे सरसकट गागा भट्ट याने केला असे लिहिले आहे. इतिहासाचे दाखले न देता केवळ शास्त्रोक्त प्रमाणे देऊन एवढंच सांगण्याचा उद्देश आहे कि राज्याभिषेकाला विरोध होणे हि शिवरायांच्या निर्णय क्षमतेवर आक्षेपकारक ठरते व तसेच राज्याभिषेक हि गोष्ट केवळ वैदिक होय याने ते धर्म पालन करणारे राजे ठरतात. तसेच राज्याभिषेकाच्या झालेले संस्कार उपनयन यज्ञ वगैरे वैदिक व मनुस्मृती या गोष्टी पुरस्कृत ठरतात . शिवकाळात हि मनुस्मृतीचा चांगला वाईट प्रभाव होता हेय स्पष्ट होते. शिवरायांवर हि धर्मप्रभाव होता हेय स्पष्ट जाणवते.
जय जिजाऊ || जय शिवराय || जय संभाजी ||
==========================
नागराज आर्य
==========================
No comments:
Post a Comment