३३ कोटी देवता ....................

प्रश्न :- वेद किवा हिंदू धर्म अथवा वैदिक धर्म अथवा आर्य मूलनिवासी लोकांचे देव किती आहेत ? आजकाल आपण पाहतो कि या समाजात  ३३ कोटी/ करोड देव बोलले जातात .?

उत्तर :-

१ ) प्रमुख गोष्ट देव एकाच आहे , जर कोणी असे बोलत असेल कि देव ३३ करोड ( ३३,००,००,०००) अशा लोकांनी प्रथम ३३ करोड नावे सांगावीत अथवा लिखित कोणत्या ग्रंथात आहेत ते दाखवून द्यावे .

२) आज हिंदू(वैदिक ) समाजात काही तरी चुकीच्या ग्रंथान द्वारे सर्वाना फसवले जात आहे . आपण आता जाणून घेवू यात कि आपल्या समाजात देव बद्दल काय मानण्यात आहे .

३) प्रमुखता आपले वैदिक आर्ष मुळ ग्रंथ वेद , ६ शास्त्र , ११ उपनिषद , भगवद्गीता ,२ महाकाव्य महाभारत रामायण , पुराण ब्राम्हण ग्रंथ जे अजिबात १८ पुराण नाहीत . मुळ गोष्ट आज १८ पुराणांना अत्यंत महत्व दिले जाते परंतु १८ पुराण हे  केवळ काल्पनिक कथांचे संग्रह आहेत जे  इतिहासावर चमत्कारी गोष्टीवर बनवले  गेले आहे . आज लोक त्या गोष्टीना भरपूर मानतात म्हणून ३३ कोटी देवांचे ३३ कोटी करोड मानण्य करून बसले , मंग पुढे भक्ती करण्या साठी अनेक मत संप्रदाय बनवले गेले .

४) आता आपण जाणून घेवूयात कि नक्की ३३ कोटी चा अर्थ काय व कोण आहेत ते देवता .   

अ) ३३ कोटी देवता आहे , नाकी देव, देव तर आधी पासून एकच आहे , बस त्याने सृष्टी रचना   करताना ८४ लक्ष्य जीवना जगण्यासाठी आवश्यक अशा ३३ गोष्टी बनवल्या ज्यांना देवता म्हंटले जाते . परंतु आपण जर आपले धार्मिक ग्रंथ काढाल १८ पुराण धरून सुद्धा कुठेच कोटीचा अर्थ करोड सापडणार नाही अथवा ३३ करोडो नावे सापडणार नाहीत, परंतु वेद मानण्य म्हणजे वेदांमधील ३३ कोटी किवा मंत्रान मध्ये आलेली नावे व १८ पुराण मधील ३३ कोटी देव यान मध्ये अत्यंत फरक सापडेल .  

ब) ३३ कोटी देवता, कोटीचा अर्थ संस्कृत मध्ये प्रकार असा होतो म्हणजे कोटी हा संस्कृत शब्द आहे तर मराठी अर्थ प्रकार होतो . आपण संस्कृत शब्दकोश काढून त्याबदाल जाणून घेवू शकता . 

क) ३३ कोटी देवता   

८ वसू = ( पृथ्वी, जल, वायू ,अग्नी ,आकाश, सुर्य ,चंद्र , नक्षत्र ) आता इथे वसू  का बोलले आहे कारण ८४ लक्ष्य योनी आहेत त्या या ८ वासुंवर आपला उदार निर्वाह करत असतात . आता तुम्ही म्हणाल कि सूर्यावर कसे जीव जगात असतील , तर तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून अथवा नासा च्या वेब वरून माहिती मिळवू शकता , काही जीवाणू हे उष्णते शिवाय जगू शकत नाहीत व नासा ला त्याचे अस्तित्व सापडले आहे . दुसरी गोष्ट या बद्दल भगवद्गीता मध्ये ८ तो १२ अध्याय मध्ये याचे प्रमाण सापडेल . तर असे ८ वसू असल्याकारणे हे जीव आपले जीवन जगू शकतात .

१० जीवन आवश्यक शक्ती = ( प्राण , अपान, व्यान ,उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंनजय ) या १० गोष्टी एका जिवामध्ये असतात म्हणजे ११ रुद्र असा उल्लेख वेद देतात . जीव म्हणजे आपले २५ तत्वाचे शरीर होय ज्या मध्ये आत्मा उपस्थित असतो . असे ११ रुद्र म्हंटले जातात , या १० गोष्टी चा वापर आत्मा करत असतो म्हून शरीरात कार्य होत असते . अथवा ते मृत घोषित होईल जर आत्मा नसेल तर . पण आत्मा ११ रुद्राना मध्ये बसत नाही . त्यामुळे १० जीवन शक्ती आणि एक जीव अर्थातच शरीर . असे ११ रुद्र . या बद्दल तुम्हाला योग दर्शन किवा पतंजली मध्ये माहिती मिळू शकते .

१२ आदित्य = म्हणजे  आपल्या मराठी कालनिर्णया प्रमाणे जे हि महिने आहेत ते मराठी नसून संस्कृत १२ महिने जे पृथ्वीच्या एका प्रदिक्षणा चे १२ भाग बनवले गेलेत . याला आयुर्वेद पुष्टि  देतो कारण ज्या भागात जी राशी जे नक्षत्र असते त्यावर शारीरक पोषक वातावरण अथवा आहार ठरवला जातो म्हणून हि १२ आदित्यांचा  उल्लेख हि वेदान मध्ये आहे . याबद्दल जाणून घेण्यासाठी वैदिक ज्योतिष शास्त्र अथवा आयुर्वेदान मधील गहन अभ्यासक  सांगू शकेल .

१ विद्युत  =अर्थात आज आपण आपल्या शरीरातील भावनाचा संचय जो अनुभवतो तो केवळ इलेक्ट्रिक वेवजद्वारे तीच हि शक्ती जीला चेतना हि बोलू शकतो .

१ यज्ञ = यज्ञ चा अर्थ भक्ती व कर्म ज्याच्यावर आपले जीवन एक नियम पद्धतीने सुरळीत चालते . कर्म सिद्धांत वाचाल तर आपणस कर्म काय असतात ते हि समजेल . भगवद्गीता वाचू शकता काही कर्म कशी घडतात या बद्दल पूरक अशी माहिती दिली गेली आहे .

 ८ वसु+, १०+१ = ११ रुद्र , १२ आदित्य , १  विद्युत १ यज्ञ (कर्म ) = ३३ कोटी देवता .

तर असे आपले हे ३३ कोटी देवता जे आपल्यात हि आहेत केवळ विशिष्ट गायी मधेच असते असा नाही प्रत्येक सजीवा मध्ये ३३ कोटी देवता असतात जे जीवन जगण्यास सहायता करतात . समाजामधील चुकीच्या माहितीला कुणी हि बळी पडू नये . हे सर्व षड यंत्र चालू आहे . तरी सर्वानी महापुरुषांना महा पुरुषच समजावे व त्याना देवता केवळ इतपत म्हणावे की त्याने धर्म स्थापना केली अन्य कोणते चमत्कार केले नव्हते. जे वेदन मधून ३३ कोटि देवता आलेत ते हेच आहे. याचा स्वीकार करावा.

5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. HI,,

    I liked all your posts and have read all of them. You have put your valuable time on this.. Do you mean that mahabharata and ramayana is also just a kalpanic stories.. ? So krishna never came on earth as human ..? So how much real is the bhagvad Geeta..?

    ReplyDelete
    Replies
    1. रामायण तथा महाभारत में भी मिलावट है उसको पकड़ने का सबसे बड़ा साधन है तर्क तर्क तथा वेद विरुद्ध जो भी बाटे उसमे मिलेगी वह सब असत्य तथा मिलावटी है आपको यदि पढ़नी हो दोनों किताबे तो आपको एक वेब देता हूँ वह से मंगवा लीजिये |

      www.vedicbooks.com

      और राम कृष्णा आदि हमारे महापुरुष है एक मर्यादा पुरुषोत्तम मानव थे तो एक योगेश्वर मानव थे दोनों भी पूर्णतः माता के गर्भ से जनम ले चुके थे तो जनम लेने वाला मानव पेशी पर्णी ही होता है ईश्वर सदासे अनंत अजन्मा है | परंतु जो भी मानव ड्रम की रह में कार्य करके सत्य को बनाये रखता है मानवता पर आघात करने वाले हर एक चीज को खत्म करता है वह व्यक्ति महापुरुष श्रेष्ठ तथा भगवान् कहलाता है इसका यह अर्थ नहीं की वो ईश्वर हुवा | तथा दोनों भी महा काव्य जो है वह अलंकारिक कविताये है | अलंकारिक भाषा का अर्थ जैसा वैसा नहीं होता | दोनों के होने के प्रबल प्रमाण है | राम सेतु श्रीलंका में रावण का महल और गुजरात के समुद्र में मिली द्वारका नगरी जो ९९ % महाभारत में वर्णित चीजोंसे मेल कहती है | हालाँकि उसको एलियन सिटी कहा जा रहा है आजकल | दोनों भी हमारे ऐतिहासिक काव्य है |

      Delete
  3. Also what are the 6 Shastra's that you have mentioned.. Can you please provide more information on this line

    प्रमुखता आपले वैदिक आर्ष मुळ ग्रंथ वेद , ६ शास्त्र , ११ उपनिषद , भगवद्गीता ,२ महाकाव्य महाभारत रामायण , पुराण ब्राम्हण ग्रंथ जे अजिबात १८ पुराण नाहीत .

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्ते
      तेथे 18 पूर्ण लिहले आहे कारण असे कि मराठी माणसांना पूर्ण म्हणले कि 18 पूर्ण आठवतात , परंतु 18 पुराण मध्ये हि 33 कोटी करोड नाही | परंतु पुराण चा अर्थच मुळात आहे कि इतिहास जो इतिहास ब्राम्हण ग्रंथाना संबोधले जाते शतपथ गोपथ आदी. 18 पुरानं मध्ये काही विकृती आहेत परंतु पूर्ण पुराणच चुकिचे नाहीत |

      6 शास्त्र
      1 = न्याय दर्शन शास्त्र = ऋषी गौतम
      2 = संख्या दार्शन शास्त्र = ऋषी कपिल
      3 = वैशेषिक दर्शन शास्र = ऋषी कणाद
      4 = योग्य दर्शन शास्त्र = ऋषी पतंजली
      5 = वेदांत दर्शन शास्त्र = ऋषी व्यास
      6 = मीमांसा दर्शन शास्त्र = ऋषी जैमिनी

      https://drive.google.com/open?id=0B2QBjFEbr-_aZi1VN3Vnc3dfQXM

      Delete